Sant Santaji Maharaj Jagnade एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.
हिवरे येथिल श्रीराम ग्रामीण पतसंस्थेच्या उभारणीत सहभाग स्थापने पासुन ते संचालक आहेत. गत दहा वर्ष ते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ही आहेत. अहमदनगर जिल्ह्या जे माथाडी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या कमिटीवर ही सदस्य म्हणुन काम करीत आहेत. श्री. सदाशिव साळुंखे यांचा नेवासा मार्केट कमीटी उभी करण्यात संचालक म्हणून फार मोठा सहभाग. या मार्केट कमिटीवर श्री. देवीदास साळुंखे संचालक म्हणुन काम करित होते. या कार्य काळात ते मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन होते, शेतकरी व्यवसायीक यांच्या व्यवहारा बरोबरच मार्केट कमिटीचा विकास यातील बारकावे वापरल्या मुळे सुसंवाद साधणारे संचालक ही त्यांची प्रतिमा होती. म्हणुन गतवर्षी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याची नियुक्ती मार्केट कमिटीवर तज्ञ संचालक म्हणुन केलेली आहे.
प्रत्येक माणसाशी आत्मीयतेने वागण्याच्या स्वभावामुळे भागवत समाजप्रिय आहेत. सुकरी येथे त्यांनी समाजविधायक कार्याला वाहुन घेतले आहे. आज ते नगर जिल्हा उत्तर तेली समाजाचे अध्यक्ष असुन. गणेश सहकारी पतसंसथा व्हाईस चेअरमन पदावर आहेत. साकुरी गावात सलग 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. साकुरी गावात समाज बांधवांच्या सहकार्याने संताजी महाराजांचे मंदिर उभारले. तेथे दरवर्षी संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते. याशिवाय त्यांनी संताजी दिनदर्शिका प्रसिद्ध केली. वधू-वर मेळाव्यात सहभाग घेऊन अनेक वधु-वरांचे लग्न जमविले. महिलांसाठी हळदी - कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून समाज संघटनेच्या प्रक्रियेत महिला शक्तीला आणण्याचा प्रयत्न केला.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 6)
तेली समाजाची देशपातळीवरील तैलिक साहु महासभा 1947 च्या दरम्यान स्थापन झाली. त्यावेळे पासुन सर्व जातींची यादी समाजा समोर होती. परंतु 2014 पर्यंत मोड (मोदी) तेली समाज नावाची पोटजात आहे हे माहित नव्हते. या समाजाशी तेली समाजाशी नाते काय ? हे तेथिल प्रसिद्धी लिखीत माध्यमात झाले आहे याची माहिती तेथील ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री. सोळुंकी यांनी दिली. यांनी सांगितलेली माहिती सत्य का असत्य हे शोधण्याची वेळ आता आली आहे. राजस्थान मधील एक राजा होता. त्याचया दरबारात ब्राह्मण समाजा एवढे बनिया समाजाला स्थान होते.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)
आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले नसतील त्यामुळे प्रश्न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ? जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल.