क्षणभर मागे पहिले तर जवळ काहीच नवहते कै. रामचंद्र भोज हे बरोबर विश्वास व धडपड घेऊन आले. आणी स्वकष्टावर भोज कुटूंबानी गरूड भरारी घेतली श्री. विजय भोज हे सामाजीक जाणीव असलेले बांधव पुर्वी 82 भवानी पेठ या समाज संसथेशी उपनगरे संलग्न नव्हती. आशा वेळी स्थानीक प्रश्न सोडविण्यासाठी कोथरूड येथे संताजी प्रतिष्ठान उभे राहू लागले श्री. भोज यात सामील झाले. वधुवर मेळावा स्नेहमेळावे संस्थेचे विविध उपक्रम यशस्वी करण्यात सहभाग. आज या संस्थेचे एक जबाबदार घटक म्हणून कार्यरथ आहेत पाटणहुन या मातीत उभे राहुन झेप घेणार्या भोज कुटूंबीयांना हार्दिक शुभेच्छा.
आज सज्जनगडाच्या पायथ्याला आनंदी नावाचे हॉटेल सुरु केले आहे. श्री. सोमनाथ यांचा समाज कारण राजकारणच पिंड यामुळेच त परळी गावचे सरपंच ही होते. गावाच्या विकासात सहभाग घेतात. तेली समाजाचे संघटन व्हावे या धडपडीतुन त्यांनी वाटचाल केली. सातारा समाज संस्थेने वधुवर मेळावे ही संकल्पना रूढ करिताना त्यांनी हवी ती मदत दिली एक वेळ ते मेळावा अध्यक्ष होते. तेली गल्ली या मासिकाच्या धडपडीला त्यांचा हातभार आसतोच.
श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.
समाजीक बांधीलकीचे संपादक व महाराष्ट्र तेली महासभेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलिप चौधरी यांच्या मातोश्रींचे वयोमानाने निधन झाले. त्यांना सर्वातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
तेली समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री, वर्धा विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा निवडूण गेलेले वर्धा जिल्ह्याचे नेते श्री.प्रमोदबाबू शेंडे यांचे दु:खद निधन झाले. या तेली समाज रत्नास ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. .परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.तसेच त्यांचे परीवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली .........