पिंपरी चिंचवड शहर तेली समाज
राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा
Pimpri Chinchwad Teli Samaj Vadhu Var Melava Form
मेळाव्याचे ठिकाण :- कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पुणे-नाशिक रोड, भोसरी, पुणे - ३९
रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०१५
mobil No 9860445600
श्री. पोपटराव पालखी बरोबर पंढरीला जात. या वेळी अडानी पण खर्या सुशिक्षीत असलेल्या आईला एक गोष्ट पटत नव्हती. माझा संताजी ज्या पालखीतून मिरवत जातो. ती इतर संतांच्या पालखी सारखी दर्जेदर नाही. ही उनिव मुला समोर मांडली श्री. पोपटरावानी यावर स्वत: विचार केला. आणि संताजी साठी पालखी स्वखर्चाने बनवुन देतो असे सांगितले. रोख पैसे न देता अंदाजे एक लाख रूपयांची पालखी स्वत: बनवुन दिली. आईची इच्छा पूर्ण केली.
माऊलीबरोबर जाणार्या लाखो माणसांचा समुद्र. त्यांना पोटभर जेवण देण्याचे काम हे अर्जुनशेठ करीत. हा लैकिक अनेक वर्षांचा. पालखी निघणार ही गोष्ट दादा भगतांच्या करवी समजली होती. पालखी मावळातून आणण्यास त्यांनीच टेम्पो दिला होता. आणि कार्यकर्त्यांना आशीर्वादही. पालखी बरडला येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर मावत नव्हता
चाकणचा सुपुत्र महाराष्ट्राचा अभिमान. मराठी माणसाची धनदौलत साठवणारा, तुकोबाचा शिष्य संताजी जगनाडे आपल्या पंढरीस जात आहे. जाता जाता आपल्या जन्मभूमीला भेटत आहे. ही भेट अविस्मरणीय ठरावी हा लोकमानस चाकणकर मंडळी टाळमृदंग घेऊन चाकणबाहेर आली. आली आली म्हणेपर्यंत संताजींची पालखी चाकणच्या शिवेवर आली. चाकणकरांचा आनंद शब्दांत मावत नव्हता. हर एकाने या भूमीच्या सुपुत्रांचे दर्शन घेतले मग संताजीचा गजर टाळ-मृदंगात करीत देहभान हरपून नाचत बागडत गावात निघाली
यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती.