‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘ दादा
कार्यरत विश्वस्त मंडळ २०१५
सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते की, श्री संताजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाजातील सर्व पदवीधर व प्रोफेशनल व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पोलीस खात्यातील, शासकीय अधिकारी इतर क्षेत्रातील उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झालेल्यांची माहिती खालील मोबाईल क्रमांकांवर पाठवावी, त्यांचा उचित सन्मान आम्ही करू इच्छितो.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 3)
पुण्याच्या कस्तुरी चौकाला इतिहास आहे. या चौकातच बराच लांब पसरलेला भगतांचा वाडा. या वाड्यातले रत्नाकर उर्फ दादा भगत म्हणुन परिचित साने गुरूजींच्या चळवळीत वाढलेले. सामाजिक कार्याची आवड व धडपड असलेले. सुदुंबर्याच्या उत्सवात हिररीने पुढाकार घेणारे. घराजवळच्या विठोबाच्या मंदिराची सेवा करणारे असे श्रद्धावान गृहस्थ. त्यांच्याच पूर्वजांनी जंगली महाराज मठ उभारण्यात पुढाकार घेतलेला.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 2)
श्री. धोंडीबा राऊत हे एक माळकरी व टाळकरी. शिक्षण जेमतेम झालेले जेमतेम शिक्षणावर पगार देणारी पोष्टमनची नोकरी करीत. तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर इंदोरी हे बर्यापैकी गाव. या गावच्या बाजारपेठेत छोटेखानी घर सुदुंबर्याच्या काळे घराण्यातील त्यांची आजी व भक्ती करावयाची वंशपरागत तोच धागा त्यांच्याकडे आलेला.