माधवराव अंबिके, माजी अध्यक्ष पालखी सोहळा
कै. दादासाहेब भगत (पुणे), कै. धोंडीबा राऊत (इंदुरी) आणि शरद देशमाने व श्री. माधवराव अंबिके आम्ही सर्व मंडळी ८२ भवानी पेठ, तिळवण तेली समाज कार्यालय येथे विचार विनीमयासाठी बसलो असताना संताजी महाराजांची पालखी सुरू करावी का ? असा विचार पुढे आला.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे यांचे वतीने व तिळवण समाज चाकण यांच्या सहकार्याने दिनांक २४/०५/२०१५ रोजी चाकण येथे १० वी, १२ वी व पदवीनंतर काय ? या बाबत मोफत विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित केले होते.
उपरोक्त शिबिरासाठी चाकण/खेड परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. श्री. प्रशांत सोनवणे - तज्ञ मार्गदर्शक व मा. श्री. दिलीप फलटणकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाज पातळीवर सत्य सांगणार्याला दमदाटी आई माई वरून शिव्या देणारे सोबतीला ठेवणे. समोरच्याचा आवाज बंद करणे. चिंतन शिबीर सारखे बुजगावणे महाराष्ट्रात फिरवणे. चविष्ट जेवण, झण झणीत भाषण १० टक्के समाजाचे २८ आमदार ५ खासदार २/३ मंत्री महाराष्ट्रात होणार शिबीर संपते, मेळावा सपतो, पदाधीकार्यांना पदे वाटणे या एका बाबीवर न थांबत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मते न मिटवता ती भेदात कशी परिवर्तीत होतील. कामा पेक्षा भेद कसे निर्माण होतील यासाठी महाराष्ट्रभर अजुन एक टोळके कार्यरथ आसते यातून साध्य काय तर संघटनेवर हुकमत पुढार्यांची निर्माण करणे. यामुळे समाजाचे जे वीर म्हणतो ते नुसतेच भाषण करू शकतात.
मत दे नाहीतर गाव सोड. विरोधात गेलास तर बेचिराख करू वळ वळ केलीस तर खांडोळी करू तु तेली आहेस राजकारण हा विषय नाही. ही कॉंग्रेस संस्कृती मधील मराठेपणाची साथ सोबत. आगदी ज्या त्या गावात ज्या ज्या भागात मराठेशाहीची ही दादागीरी. या दादागीरीने गुलामी दिलेली. आपण ती सुखात जपत होतो. सुखात यासाठी या बद्दल ना खेद ना दु:ख ना उठाव, ना संघर्ष ही वास्तवता स्विकारून जगत होतो.
या वेळच्या विधानसभेसाठी ३६ मतदार संघात फक्त ४ उमेदवार भाजपा देतो फक्त ३ विजयी होतात. याच दरम्यान महाराष्ट्र तेली महासभेचे पदाधिकारी निवडणूकीचे फड गाजवतात सांगत मोदी तेली म्हणून भाजपाला मत. तिकीट वाटपात गुजराथ मधले सोमु भाई का आले नाहीत. तेली समाजाला अधीक उमेदवार का देऊ शकले नाहीत खरा इथे प्रश्न आहे.