Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

सेल्स न मधुन नितीन वाईकरांनी केली जिवनाची जडणघडण.

घरात गरिबी आली तीने घराला कवटाळलेले अगदी संस्कारक्षम वयातच ही अवस्था झालेली. वडील सकाळी घरा बाहेर पडत हाळी देत फेरीवाल्यांची काम करीत या कामातुन चार पैसे जमा त्यावर घर चालत आसे. या वेळी मामा नादेवराव सोनवणे यांनी पहिले आपला भाचा नितीन यास संभाळले. शिक्षण ही देऊ केले. शिक्षण तरी किती फकत 11 वी या उमेदीच्या वयात वाईकरांना घरची अवस्था पहावेना त्यांनी विचार केला पुढील शिक्षणा पेक्षा नोकरी बरी. गावात चौकशी करून त्यांनी सेल्सनची नोकरी स्विकारली दुकानात येणारे गिर्‍हाईक हे गिर्‍हाईक असते त्याचा विश्‍वास संपादन करणे आपल्या मालाची वैशिष्टे स्पष्ट करून त्याला परवडेल व आनंदी होईल या पद्धतीने माल खपवने.

दिनांक 24-10-2015 01:30:50 Read more

शेंगा गाडीवाले तेली समाजाचे पन्हाळे हजारो लिटर दुध विक्रते झाले.

    शिक्षण आहे, नोकरी नाही, खिशात पैसा नाही म्हणुन व्यवसाय नाही म्हणुन पैसा नाही हे रडगाणे गात बसण्यापेक्षा आपण यावर ही यश कमवु शकतो हे राहुरी जि. नगर येथील श्री. संजय विठ्ठल पन्हाळे यांनी सिद्ध केले आहे. वडिल विठ्ठल पन्हाळे हे संगमनेर येथे उमेदीच्या काळात ओल्या, भाजक्या शेंगाची गाडी लावत होते. ही गाडी लावता लावता भाजीपाला विक्री करू लागले. यातुनच गावकामगार तलाठ्याची नोकरी लागली.

दिनांक 24-10-2015 01:11:46 Read more

वाचकवडे युवकाची खडतर धडपड

    पौड मध्ये घराचे छप्पर डळमळीत झाले. पावसाळ्यातील पाऊसाच्या झडीत ते अधीक मेटाकुटीस येत होते. घर चालवणेच जिकेरीस येत आसे. यातुनही हा चि. अनंत वाचकवडे एम.ए. झाला. सुशिक्षीत बेकार्‍यांंच्या तांड्यातील एक घटक झाला. या तांड्यात वावरण्यापेक्षा परस्थीतीवर मात करावी नुसते रडगाणे गात बसण्यापेक्षा हात पायांना गती द्यावी या साठी इंदापूर येथे शिंदे आत्याकडे गेला. या ठिकाणी अत्याभावाकडे थांबला. गेली 50 वर्ष इंदापूर शहराला जीवन फोटो स्टुडीओ चांगलाच परिचीत.

दिनांक 24-10-2015 00:16:49 Read more

सत्याची कास न सोडणारे खळदकर बंधु.

    कै. भीकुशेठ खळदकर एक सुजान व्यक्तीमत्व होते. श्रीकृष्ण या दैवत्वावर अढळ निष्ठा होती चक्रधरांच्या वचनांशी ते बांधील होते. यातुनच त्यांनी संसाराकडे पाठ करन चक्रधर मंदिराचा जिर्णेद्धार केला. या साठी स्थानीक बांधवांचा सहभाग व त्याग घेऊन ते गावो गावी फिरावयास गेले. आशा श्रद्धा स्थानाचे उद्घाटन त्यांनी 1987 मध्ये केले. उद्घाटना नंतर 1990 ला ते वारले पण आदर्शाचा ठेवा ठेऊन गेले. श्री. सुर्यकांत यांनी तो जपला, जोपासला व वाढविला सुद्धा श्री. सर्यकांत शेठ हे तिळवण तेली समाज कडुसचे अध्यक्ष सामाजीक प्रश्‍ना साठी सावध

दिनांक 23-10-2015 12:10:48 Read more

नाशिक तेली समाजाचे श्री. रमेश उचित यांचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा

maligave nashik teli samaj ramesh uchit

    नाशिक मालेगांव :- शासकिय  सेवेत राहुन समासेवा हा श्‍वास बनलेल्या कर्चचार्‍याची सेवा सदैव स्मरणात राहते. मालेगाव बीएसएनएलची सेवा ग्राहकाभिमुख करण्यात रमेश उचित यांचा सिंहाचा वाटा आहे. मालेगावची साहित्य चळवळ त्यांच्यामुळे गतीमान झाली. मालेगावकर त्यांच्या सेवेची जरूर नोंद ठवतील असे उद्गार महाराष्ट्राचे सहार राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी काढले.

दिनांक 18-09-2015 15:22:07 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in