मालेगांव, नाशिक :- तालुका व महानगर अध्यक्ष श्री. रमेश उचित यांच्या उपस्थीतीत तेली महासभेची पदाधीकार्यांची सहविचार सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी श्री. रमेश उचित होते. ३५ पदाधीकार्यातील २४ पदाधिकारी उपस्थीत होते.
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती,
साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली .
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३० मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे.