Sant Santaji Maharaj Jagnade
जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाजाच्या एका पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तळोदा तेली समाज - दोंडाईचा येथील चिमुकलीयर लैगिक अत्याचार करणाच्या नराधमास अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत तळोदा येथील तेली पंच समाज मंडळाने मूक मोर्चा काढून तळोदा येथील नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
"मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
श्रीरामपुर तालुका प्रांतिक तैलिक महासभा व युवा महासभा यांच्या वतीने भव्य मेळावा श्रीरामपुर तालुका तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा दिनांक 27/03/2018, मंगळवार रोजी अतिशय सुंदर व थाटामाटात संपन्न झाला. उतर अहमदनगर जिल्हा प्रांतिक जिल्हा पदाधिकार्यांचे, तालुका प्रमुख, समाज प्रतिनिधी हजर होते.