Sant Santaji Maharaj Jagnade लोणी ता. राहाता येथे संताजी बचत गटाची स्थापना झाली अनेक समाजबांधव उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली अनेकांनी आपले विचार मांडले यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सोमनाथराव बनसोडे सर यांनी बचत गटाची आवश्यकता का आहे यावर मार्गदर्शन केले.
मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय वडगाव,ता.मावळ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.
जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाजाच्या एका पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तळोदा तेली समाज - दोंडाईचा येथील चिमुकलीयर लैगिक अत्याचार करणाच्या नराधमास अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत तळोदा येथील तेली पंच समाज मंडळाने मूक मोर्चा काढून तळोदा येथील नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.