श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??
पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे : आज रविवार दिनांक 28.1.2018 रोजी सदुंबरे येथे संस्थानचे अध्यक्ष मा.शिवदासशेठ ऊबाळे यांच्या अध्यक्षते खाली संस्थानची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेसाठी विविध जिल्हयातून 50 हून अधिक समाज बांधव व भगीनी ऊपस्थीत होते.
हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.
अखिल भारतीय तेली महासभेची राष्ट्रिय कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या कार्यक्रमामध्ये महासभेच्या मुंबई कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. महासभेच्या मुंबई अध्यक्षपदी गोरेगाव येथे वास्तव्यास असलेले व अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष गुप्ता यांची वर्णी लागली आहे.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे) आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८