आपल्या पुणे शहराचे भुषण, तसेच आपल्या संपूर्ण तेली समाज, व बारा बलुतेदारांचे नेते पुणे म.न.पा. मध्ये विविध पदे भुषविणारे पुणे म.न.पा. चे विद्यमान नगरसेवक मा. आबा सोा. बागुल ह्यांना वाढदिवसाच्या शतश: हार्दिक शुभेच्छा.
आम्ही बिबवेवाडी , धनकवाडी, अप्पर, कात्रज परिसरात समाज बांधवांनी अतिशय प्रमाणिक पणे वडीलकीचे नात्याने मा. आबांनी 82 भवानी पेठ तिळवण तेली समाज पंचवार्षिक निवडणुकीत नमो.: नमा: पॅनलचे विजयात दिलेली प्रमाणिक साथ पाहीली आहे. आबाचे नेतृत्वाची गरज संपूर्ण तेली समाजा प्रमाणे इतर समाजालाही आहे. आबा आमदार होणे समाज हीताचे दृष्टीने भावी काळात गरजेचे आहे.
तेली समाजाला महानगरपालिकेत मानाचे पान मिळवून देणारे आबा बागूल. गेल्या 30 वर्षांपासून अखंड महानगरपालिकेत आपला पाय रोवून बसलेले आबा हे खरंच आपल्या समाजाचे भूषण आहे. आबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातून समाजकार्य करत असताना आपल्या समाजाइतकेच इतर समाजावरही तितकेच प्रेम केले. गेली कित्येक वर्षे मी पाहतोय आबांनी हजारो लोकांना काशीचे दर्शन घडविले.
तिळवण तेली समाज, पुणे
82, भवानी पेठ, श्री संत संताजी जगनाडे महाराज पुला जवळ, पुणे 411002
आयोजित
उच्चशिक्षित वधू वर पालक परिचय मेळावा
वेळ रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 तेसायं. 5 पर्यंत
स्थळ- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट, गंजपेठ, फायर ब्रिगेड शेजारी, पुणे 411 042
- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.