Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज तेली समाज संस्था केंद्र भोर
श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा
पुण्यतिथी सोहळा - मिती मार्गशिर्ष कृ. 14 रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी 9 वाजता.
स्थळ श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन, सर्व्हे नं. 78-10/1/2001
आंबाडखिंडा, वाघजाई नगर, मु. भोर, जि. पुणे
दि. 1 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी अहमदनगरच्या आध्यात्मिक, पावन नगरीत - अहमदनगर महानगर व जिल्हा तेली गल्ली मासिक आयोजित भव्य-दिव्य असा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा खुप थाटामाटात, उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. सर्वांच्याच चेहर्यावर आनंदाचे, समाधानाचे, कार्य सफ लतेचे हास्यं दिसुन येत होते. पण माझं मन मात्र मला भुतकाळातच घेऊन जात होतं.....
सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दिनांक 24/12/2017 रोजी सायंकाळी ठिक 4.00 वाजता नृसिंह हायस्कुल, शिताळे नगर, जुनी सांगवी, पुणे - 411 027, येथे आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षपद श्री. दिलीप श्रीरंग विभूते, प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन आणि पाहुण्याचे स्वागत सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. श्री. दिलीप फलटणकर सर आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कारर प्राप्त,
क्रांतीकारी अभिवादन संत जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर
बहुजनरत्न मानवतावादी संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरू तुकारामाच्या ग्रंथाचे लिखान करून संत तुकारामाच्या वैचारिक-विज्ञाननिष्ठ विचार जिवंत ठेवला. 8 डिसेंबर संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आपण संत तुकाराम व संताजीच्या वैचारिक विचाराचा वारसा बहुजन समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता कार्यरत रहावे.
देशभरातील तेली समाजाची संख्या 14 कोटी आहे. काही राज्यामध्ये तेली मसाज एनटीत आहे. महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये हा समाज ओबीसीत आहे. आज ओबीसीत सवलतीच नाहीत. त्यातल्या जातींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तेलीच असलेला तिरूमल समाज एनटीत आहे. आमचे रोटी बेटा व्यवहार होतात; पण मराठवाड्यात व उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीत आहे.