संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मागेच मी मांडले आहे की वेदांना झीडकारणारे विचार, देव निर्माण करणार्याचे आम्हीबाप आहोत. संताजी उभे राहिले. हे विचार एैकले, लिहीले, जगले व संभाळले किती कडवट सत्य आहे. हे अनेकांना पटणार नाही पण संत संताजींनी जपलेल्या अभंगातून हेच विचार उमटत आहेत. ते फक्त भार वहाणारे होते म्हणजे ते लेखन व संभाळणारे होते ? हे एक अबाधीत सत्य की ते बलुतेदार पैकी होते. ते कारू नारू पैकी होते. ते नामस्मरण, हरी किर्तन, संत संगती, साधे, सत्य आचारण, निती आणीती अनासकती यावर ते उभे होते.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.
1) संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा करणार दौरा 2) ग्रामीण भागात देणार ज्यास्त लक्ष 3) तेली समाजातील पोट जाती एकाच बॅनर खाली करणार काम 4) संस्थेने महाराष्ट्र राज्यात जुळवले 97 मोफत विवाह 5) संस्था मोफत करते काम समाज बांधवाना कोणत्याही फी वर्गणी नाही 6) महाराष्ट्र राज्यातून मिळतेय सहकार्य 7) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संस्थेच्या केल्या कमिट्या स्थापन
बैठकीला उपस्थित संस्थापक अध्यक्ष श्री कुंडलीक देशमाने. प्रदेश जेष्ठ उपाध्यक्ष श्री विजयकुमार शिंदे. प्रदेश महिला अध्यक्षा सौ अनिताताई गायकवाड. प्रदेश मुख्य सचिव श्री राहुल भिसे. प्रदेश उपाध्यक्ष श्री दिलीप चव्हाण. प्रदेश कार्याध्यक्ष श्री पंडित पिंगळे. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री सुधीर भिसे तेली गल्ली संपादक श्री मोहन देशमाने. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेशकुमार शिंदे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन देशमाने .नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री महेश चांदवडकर.
आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा
वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती.
वनस्पतिजन्य पदार्थांपासून तेलाची निर्मीती : दाबाच्या योगाने तेलाची निर्मीती : भुईमूग, तीळ, करडई इत्यादींच्या बियांपासून तेल काढण्यासाठी दगडी घाण्याचा उपयोग पूर्वापार तेली समाजा कडुन भारतात चालत आलेला आहे. या तेल घाण्यात एक दगडी उखळी असून तीमध्ये एक वजनदार लाकडी दांडा (लाट) बैलाच्या शक्तीने फिरविला जातो. उखळीत तेलबिया घातल्या म्हणजे लाटेच्या दाबाने त्या चिरडल्या जाऊन त्यामधील तेल बाहेर पडते. नंतर लाट बाहेर काढून उखळीतील तेल, त्यात तेल, त्यात कापड बुडवून व ते बाहेर काढून पिळून मिळवितात.