तिळवण तेली समाज, पुणे
82, भवानी पेठ, श्री संत संताजी जगनाडे महाराज पुला जवळ, पुणे 411002
आयोजित
उच्चशिक्षित वधू वर पालक परिचय मेळावा
वेळ रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 तेसायं. 5 पर्यंत
स्थळ- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट, गंजपेठ, फायर ब्रिगेड शेजारी, पुणे 411 042
- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.
पुणे तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नमो नम: पॅनेलभरघोस मतांनी विजयी झाले. यामध्ये श्री. घनश्याम वाळुंजकर, श्री. दिलीप व्हावळ, श्री. प्रकाश करडिले, श्री. माउली व्हावळ, श्री. अशोक सोनवणे या माजी विश्वस्तांसह पुणे शहर विभागातून श्री. महेश (मुन्ना) भगत, श्री. दीपक पवार, हडपसर विभागातून श्री. प्रीतम केदारी, कोथरूड विभागातून श्री. रत्नाकर दळवी, श्री. अनिल घाटकर, श्री. दिलीप शिंदे, नगर रोड विभागातून श्री. प्रवीण बारमुख, अप्पर इंदिरानगर विभागातून श्री. सचिन नगिने, श्री. उमाकांत उबाळे, सिंहगड रोड विभागातून श्री. गणेस (मिलिंद) चव्हाण हे विश्वस्तपदी भरघोस मतांनी विजयी झाले.