नाशिक शहर तेली समाज वधु वर व पालक मेळावा
दि. 25 डिसेंबर 2017
मेळाव्याचे ठिकाण कै. यादवराव वाघ नगर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कतीक सभागह, भामा नगर, मुंबई नाका, नाशिक
फॉर्म पाठविण्याचा पत्ता - श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक 422 001, फोननं. 0253, 2576425
श्री. घन:शाम बाळकृष्ण वाळुंजकर विश्वस्त पुणे तिळवण तेली समाज.
आंबा बागुल यांना प्रथम 61 निमित्त अभिष्टचिंतन आपण पुणे महानगर पालिकेच्या इतिहासात पुढच्या वेळेस निवडून येऊन जागतिक विक्रम करणार यांत कुलीही शंका नाही. व आपण हा विक्रम येत्या 100 वर्षेत कोणी मोडू शकणार नाही.
श्री. आबा बागुल व माझे जुने नाते. योगा योग असा त्यांचे बालपण मामाच्या गावाला गेलेले. त्याच राजगुरू नगर परिसरात माझे बालपण गेले. संस्काराची शिदोरी इथेच मिळालेली माझे वडील स्वातंत्र्य सेनानी ल. वी. शिंदे यांनी याच परिसरात स्वातंत्र्याच्या रण संग्रामात भाग घेतला होता. याच परिसरात श्री. आबा लहानाचे मोठे कष्ट करून झाले. विडलांच्या निधना नंतर आईने व लहान मुलांना गरिबी आली म्हणून लाजू नका व श्रीमंती आली म्हणून माजू नका हा मंत्र दिला.
आपल्या पुणे शहराचे भुषण, तसेच आपल्या संपूर्ण तेली समाज, व बारा बलुतेदारांचे नेते पुणे म.न.पा. मध्ये विविध पदे भुषविणारे पुणे म.न.पा. चे विद्यमान नगरसेवक मा. आबा सोा. बागुल ह्यांना वाढदिवसाच्या शतश: हार्दिक शुभेच्छा.
आम्ही बिबवेवाडी , धनकवाडी, अप्पर, कात्रज परिसरात समाज बांधवांनी अतिशय प्रमाणिक पणे वडीलकीचे नात्याने मा. आबांनी 82 भवानी पेठ तिळवण तेली समाज पंचवार्षिक निवडणुकीत नमो.: नमा: पॅनलचे विजयात दिलेली प्रमाणिक साथ पाहीली आहे. आबाचे नेतृत्वाची गरज संपूर्ण तेली समाजा प्रमाणे इतर समाजालाही आहे. आबा आमदार होणे समाज हीताचे दृष्टीने भावी काळात गरजेचे आहे.
तेली समाजाला महानगरपालिकेत मानाचे पान मिळवून देणारे आबा बागूल. गेल्या 30 वर्षांपासून अखंड महानगरपालिकेत आपला पाय रोवून बसलेले आबा हे खरंच आपल्या समाजाचे भूषण आहे. आबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातून समाजकार्य करत असताना आपल्या समाजाइतकेच इतर समाजावरही तितकेच प्रेम केले. गेली कित्येक वर्षे मी पाहतोय आबांनी हजारो लोकांना काशीचे दर्शन घडविले.