Sant Santaji Maharaj Jagnade
नसरापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद बाळासाहेब देशमाने यांची श्री संताजी महाराज जगनाडे तेली समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जगनाडे यांनी देशमाने यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. देशमाने यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून तेली समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. समाजाच्या प्रश्नासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला आहे.
पुणे येथे ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृहात पुणे जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अळकुटी येथील रामकृष्ण अशोकराव पिंगळे व अशोकराव पिंगळे यांचा प्यार की एक कहानी चित्रपटाचे लेखन व माय चित्रपटाचे डायरेक्टर मिस्टर रायटर हा किताब देवून नुकताच विश्वस्त घनश्याम वाळंजकर, प्राध्यापक डॉ.सुनील धोपटे तसेच कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, बाळकृष्ण दारुणकर यांच्याहस्ते सत्कार केला.
जुन्नर मध्ये तिळवण तेली समाज मंडळाकडून यावर्षी श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगोत्सवानिमित्त रोज होणाऱ्या महाआरती मध्ये उपस्तीत महिलांची लकी ड्रा पद्धतीने चिट्टी काढली जाते आणि विजेत्या महिलेला "मानाची पैठणी" दिली जाते.
21 सप्टेंबर 2018 रोजी समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल २ पैठणी लकी ड्रा ची सोडत करण्यात आली.
सेवेकरी पैठणीच्या मानकरी -
श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर ह्या तेली समाज संस्थेचा वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून तर विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थापक श्री शामराव भगत अध्यक्ष श्री अजित दळवी श्री उपअध्यक्ष प्रितम शेठ केदारी कार्याध्यक्ष श्री आशोक सोनवणे सचिव श्री मोहन चिंचकर
औरंगाबाद - प्रतिनिधी, गणेश उत्सवच्या माध्मातून सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते, या निमीत्ताने विचारांची देवाण घेवाण होती, व एकमेकांचा परिचय होऊन समाज संघटनेला गती मिळते, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, वंजारी समाज, सर्वच जातींचे लोक आप आपल्या माणसां साठी आप आपल्या जातींसाठी एकत्र येत आहे,आता तेली समाजाने ही संघटीत होणे ही काळाची गरज आहे