सर्व समाज बांधवाना कळविन्यात येते की दि 24/01/16 रविवार रोजी आपण वधु-वर मेळावा आयोजित केलेला आहे.त्याच्या आयोजन सबंधी एक महत्वपूर्ण बैठक दि 18/10/15 रविवार वेळ 7:30 सायं.रोजी
महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबंधुना नम्र विनंती औदुंबर ता. पलूस जि. सांंगली येथे राज्यस्तरीय विधवा/विधूर/घटस्फोटित/अंपग यांचा वधू-वर मेळावा दि. 08 जानेवारी 2017 रोजी दत्त मंगल कार्यालय, औदुंबर ता.पलूस जि.सागली येथे सकाळी 11_00 वाजता आयोजित केला आहे. वधू-वर नोंदणी मोफत आहे.तरी गरजू वधू-वर यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आयोजक सागली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत अंकलखोप व भिलवडी लिंगायत तेली समाज.
श्री. संताजी प्रतिष्ठान नगररोड पुणे - 14 यांचे तर्फे दिनांक 28-08/2016 रोजी सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत अनुसया सांस्कृतीक भवन, साई मंदिराशेजारी, साई नगरीनगररोड, पुणे 14 येि 10 वी / 12 वी पदवीधर मधील 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा गुणगौरव व पालकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप विद्यार्थांना सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्र तसेच पालाकांना श्रीफळ व गुलाब पुष्प असे होते.
पैठण येथिल संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण या संस्थेची दि 2 ऑक्टोबर 2016 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री गंगाधर आसाराम म्हस्के याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत उपआयुक्त धर्मदाय औरंगाबाद यांच्या आदेशावरून कार्यकारी मंडळाची निवड निवडणुक निर्णय अधिकारी अॅड श्री बी जी उपाडे यांच्या समक्ष बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस संस्थेच्या अध्यक्ष पदी जालना येथिल प्रसिध्द व्यापारी श्री छगनराव क्षीरसागर उपाध्यक्ष पदी श्री केदारनाथ सर्जे सचिव पदी श्री भगवानराव मिटकर कोषाध्यक्ष श्री यशवंतराव बरकसे सहसचिव श्री उध्दव सिदलंबे कार्यकारी विश्वस्त श्री प्रल्हादराव मिसाळ श्री विक्रमराव सर्जे श्री गंगाधर म्हस्के श्री भारतसेठ कसबेकर श्री शिवमूर्ती ससाणे श्री सखाराम सिदलंबे याप्रमाणे कार्यकारीणी बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील कुमठे फाट्यावर असलेल्या साई मंगल कार्यालयामध्ये उद्योगपती, जायगावचे सुपुत्र पोपटराव गवळी यांचा तेली समाज व ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार सन्मानपत्र दऊन पफथवीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, दादाराजे खर्डेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बाचल, माजी जि. प. सदस्य किरण बर्गे, मनोहर बर्गे, सरपंच जयश्री सपकाळ, सुभाष उर्फ नाथा कदम उपस्थित होते.