Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज डोंबिवली श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6:00 ते 9:00 वा. श्री संताजी सेवा मंडळ डोंबिवली याच्या तर्फे साजरी करण्यात येणार आहे. 2 ते 3 दिवसात मंडळाचे सदस्य आपल्याकडे निमंत्रण पत्रिका घेवून येतील .
रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था
कोकणस्थ तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा 2018
कार्यालय - आनंदभुवन, आयशर आयटी पार्क जवळ, अॅग्रीक्लचर बस स्थानक,
जयभवानी नगर, वागळे इस़्टेट, ठाणे 400 604
वधु - वर मेळावा रविवार दिनांक 28/1/2018 वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत.
मेळाव्याचे ठिकाण - ठाणे महानगर पालिका माध़्यमिक शाळा, किसन नगर नं.3, वागळे इस़्टेट, ठाणे - 400604
चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी दिनदर्शिका प्रकाशन आणि स्नेहमेळावा वार सोमवार ता. 15/1/2018 रोजी मा. श्री. सतिशशेठ भालचंद्र वैरागी साहेब (अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा कोकण विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे कार्याध्यक्ष श्री. गणेश मुरलिधर धोत्रे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रघुवीरजी शेलार साहेब,जिल्हा सचिव मा. श्री. दिपकजी राऊत साहेब जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई लांजेकर मँडम,
राजुर - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता.
आता आपली जात कोणती ? ( भाग 1 )
महाराष्ट्राच्या पोटजाती विसरण्याची सुखात मी केली. मीच सगळा तेली समाज एका झेंड्या खाली आणला ही मोठे पणाची कमान मी लावली. पण पोटजाती विसरा एकजुट करा म्हणता म्हणता एक घोडचुक झाली. समोर समाज बांधव दिसले. त्यांच्या चेहर्यावरचा भाबडा विश्वास दिसला. खिाशात पैसा आहे, मिरवाईची हौस आहे. पद पाहिजे व त्यावर प्रतिष्ठा मिळते हे पद मिळवण्यासाठी कटपुतली सारखे जे उड्या मारतात.