Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

जामखेड तेली समाजाच्या देशमाने बंधुंचे शुन्यातुन विश्‍व.

    जामखेड तालुक्यातील पानाळी गाव या गावातून कै. खंडू देशमाने जामखेडला आले. येथे राऊत मेहुणे होते. देशमाने यांनी प्रथम निवार्‍याची सोय पाहिली व कुटूंबासाठी झटु लागले. त्यांना 1) बाबासाहेब,  2) दत्तात्रय 3) नवनाथ, 4) जालिंदर, 5) भाऊसाहेब 6) विश्‍वास ही मुले व 3 मुली असे मोठे कुटूंब ते संस्कारीत करित होते.  श्री. बाळासाहेब देशमाने वडिलांच्या बरोबर बैलाचा व्यापार काही काळ केला परिसरात ऊस तोड मजुर होते. त्या साठी त्यांचे बैलगाडी हे साधन होते. त्यामुळे व्यपार बरा होता. परंतु बाबासाहेबांनी जास्त लक्ष संकरीत गाई खरेदी विक्री सुरू केली. यात ही जम बसविला. याच तपनेश्‍वर मंदिर रस्त्यावर रहात्या घरा मध्ये किराणा मालाचे दुकान सुरू केले. व्यापाराची संस्कृती जोपासत त्यांनी जामखेड मार्केट यार्ड मध्ये आडत दुकान सुरू केले.

दिनांक 11-06-2016 13:48:42 Read more

बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई आयोजित वधु-वर पालक परिचय मेळावा 2016

बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई आयोजित
राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा 2016

    बृहन्मुंबई तिळवण तेली समाजाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन दि. 02/10/2016 रोजी दुपारी 1.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत म्युपिसिपल स्कुल, ना.म.जोशी मार्ग, पोलीस स्टेशन समोर, डिलाईल रोड, मुंबई - 400011 येथे करण्यात आले आहे.

    मेळावा प्रवेश शुल्क रू. 400 /-  राहील कार्यक्रमास वधु-वरांची व पालकांची एका वेळेच्या चहा व अल्पोहराची व्यवस्था केली जाईल तसेच एक वधु-वर पुस्तिका देण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित रहाणार्‍या अतिथींना रू. 100 /- भरून प्रवेश दिला जाईल फार्म सोबत रू. 400 /- रोख/मनी ऑर्डर/ डीडी. बृहन्मंबई तिळवण तेली समाज या नावाने काढावा व सौ.  अर्चना मनोहर कोते, बी/23 कल्यणादास वाडी, जयहिंद सिनमेासमोर डॉ. बी.ए. रोड चिंचपोकळी (पूर्व) मुंबई 400012 येथे पाठवावा किंवा 

दिनांक 29-08-2016 16:26:32 Read more

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सातारा जिल्हा तेली समाजा तर्फे सत्कार

   अनेक समस्यांनी ग्रस्त असलेलेव हजारो कोटींच्या कर्जाचा बोजा असलेले ऊर्जाखाते बावनकुळे यांनी अतिशय खंबीरपणे गेल्या दीड वर्षात प्रगतीपथावर नेऊन राज्यातील शेतकर्‍यांना, सामान्य ग्राहकांना व उद्ोजकांना चांगल्या स्वरूपात लाभ करून दिला आहे. मंत्री बावनकुळे यांनी सर्वसामान्यांची कामे तळमळीने व प्रमाणिकपणे तडीस नेली आहेत, त्यामुळेचतेली समाजाला बावनकुळे यांच्याबद्दल आदर आहे. घराच्या लोकांचा पाठींबा व कौतुकांची थाप पाठीवर असावी, जेणेकरून तेली समाजातील हे नेतृत्व आसेच दिवसेंदिवस राज्य व देश पातळीवर प्रगती पथावर रहावे ही सदिच्छा व्यक्त करून जिल्ह्यातील समस्त तेली समजातर्फे त्यांना कर्तृत्वाचे सन्मानपत्र देण्यात आले.

दिनांक 31-03-2016 19:53:44 Read more

सातारा जिल्हा तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा

    दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.

दिनांक 11-02-2016 15:20:45 Read more

श्री. आनंद बाळासाहेब देशमाने यांनी घडविले परिवर्तन

Anand Deshmane elected as chairman of sant santaji jagnade maharaj utsav

            या शिक्षणातून एवढेच शिकले की सत्तेत जायचे तर पहिला आपल्या तेली, माळी, सुतार, कुंभार, नाभीक, परिट या आपल्या जाती पाहिजेत. त्याच बळावर अर्थीक बलवान असलेल्या मराठा समाजाची सोबत. ही सर्व जुळवा करून ते 2004 मध्ये ते वेल्हा ग्रामपंचायत सदस्य झाले. सर्वांना सोबत घेऊन पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडले गेले. तेंव्हा त्यांनी जि.प. चे नियम व निधी यांचा अभ्यास केला. मला मिळालेल्या या संधीचा लाभ माझ्या गटात गेला पाहिजे. डोंगरी विकासाचा निधी वाड्या वस्त्यावर घेऊन जाण्यात त्यांनी आघाडी घेतली.

दिनांक 20-01-2016 22:10:38 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in