कै. श्रीमती शांताबाई विश्वनाथ देशमाने यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल :- श्री. प्रभाकर विश्वनाथ देशमाने, सै. पद्मा कांंतीलाल भीसे, श्रीमती मंगल बाबुराव चव्हाण, श्री. चंद्रकांत दत्तात्रय देशमाने, श्री. मोहन दत्तात्रय देशमाने, श्री. अरूण दत्तात्रय देशमाने, श्री. सुधीर दत्तात्रय देशमाने व देशमाने परिवार सायगाव, तेली समाज सातारा
महाराष्ट्रातुन कर्नाटकात जाऊन उद्योग क्षेत्राला काबिज करणार्या नांदगिरीकर घराण्यातील कै. विनोद रघुनाथ नांदगिरीकर यांचे दु:खद निधन झाले सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
तेली गल्ली (मासिक) परिवार
शोकाकुल : नांदगीरीकर व कचुरे परिवार हुबळी (कर्नाटक)
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे या संस्थेची स्थापना किमान 100 वर्षापुर्वी झालेली आहे. संस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील गरिब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मा. कै. रावसाहेब पहाळे, मा. कै. रावसाहेब केदारी यांनी 40 वर्षापुर्वी ही योजना सुरू केली आहे. मा. श्री. बापूसाहेब वैरागी यांनी ही योजना पुढे चालू ठेवली. श्री. वैरागी हे शिक्षण समितीचे 25 वर्षे चिटणीस होते. सध्या मागील 5 वर्षा पासून श्री. बाळासाहेब शेलार हे शिक्षण समितीचे चिटणीस म्हणुन काम पहात आहे.
देडगांव ता. नेवासा हे मुळ गाव सन 1993 मध्ये त्यांनी आपले गाव सोडले ते कोरगाव येथे आले. सुरवातीस छोटे मोठे उद्योग करू लागले. या नंतर रिअल इस्टेट उद्योग निवडला. या उद्योगाला चांगला जम बसविला याच जोडीला समाज सेवेची आवड. तुळजाभवानी तरूण मंडळाची सुरूवात केली. जय संताजी युवक संघटना सर्वांना बरोबर घेऊन सुरू केली. श्री. संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते.
जामखेड तालुक्यातील पानाळी गाव या गावातून कै. खंडू देशमाने जामखेडला आले. येथे राऊत मेहुणे होते. देशमाने यांनी प्रथम निवार्याची सोय पाहिली व कुटूंबासाठी झटु लागले. त्यांना 1) बाबासाहेब, 2) दत्तात्रय 3) नवनाथ, 4) जालिंदर, 5) भाऊसाहेब 6) विश्वास ही मुले व 3 मुली असे मोठे कुटूंब ते संस्कारीत करित होते. श्री. बाळासाहेब देशमाने वडिलांच्या बरोबर बैलाचा व्यापार काही काळ केला परिसरात ऊस तोड मजुर होते. त्या साठी त्यांचे बैलगाडी हे साधन होते. त्यामुळे व्यपार बरा होता. परंतु बाबासाहेबांनी जास्त लक्ष संकरीत गाई खरेदी विक्री सुरू केली. यात ही जम बसविला. याच तपनेश्वर मंदिर रस्त्यावर रहात्या घरा मध्ये किराणा मालाचे दुकान सुरू केले. व्यापाराची संस्कृती जोपासत त्यांनी जामखेड मार्केट यार्ड मध्ये आडत दुकान सुरू केले.