Sant Santaji Maharaj Jagnade
स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले.
प. महाराष्ट्रातील डाव्या विचारसरणीचे एक लढवय्य नेते होते. समता, स्वातंत्र या विचार सरणीचे बांधव संपत्ती त्यांच्या उंबरठ्यावर आली होती. हुबळी येथील कै. काशिनाथ अंबाजी नांदगीरीकरांचे जावई. त्यांचे कुटुंबही तोलामोलाचे होते. पण या सर्वाकडे पाठ फिरवून, कामगार, शेतमजुर यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावरची लढाई लढत होते. सामान्य माणसाची एक तळपती तलवार म्हणुन ते सर्वा बरोबर नव्हे तर सर्वा समोर.
तेली समाजातील लोणंद शहरातील श्री. रमेश हरीभाऊ गवळी (अण्णा) यांचा माझा अनेक वर्षापासुन परिचय. पुर्वपार समाज सेवचा असलेला वारसा आदर्श पने चालु ठेवलला. कै. बाळासोा भारदे, कै. आ. बाळासोा. बारमुख, कै. रामभाऊ मेरूकर वाई आशा आनेक गांधीवादी विभुतीच्या विचाराची प्रेरणा. समस्त सातारा जिल्हा तेली समाज परिषद , सन 1988 ते 1992 पर्यंत 6 वेळा लोणंद येथे सामुदाईक विवाहाचे युवक संघटने द्वरा आयोजन यशस्वी करून प्रश्चिम महाराष्ट्रात प्रथम मुहूर्त मेढ रोवली त्याबद्दल सामुहिक विवाहाचे प्रणेते
याच मातीत जन्मलेले व पुणेकरांनी आपले म्हंटलेले श्री. हरिष सदाशिव देशमाने त्या काळातील पदवीधर. पुण्यात येऊन परस्थिती बरोबर दोन हात करीत कंपनीत नोकरी करू लागले. शालेय शिक्षण पुर्ण करित असताना उत्कृष्ट वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव पडला यातुनच त्या ओघवत्या अभ्यासपुर्ण भाषा प्रभाव पडला आणि ते काही काळात भोसले यांच्या भाषणा सारखे बोलु लागले.
हे मुळचे वाईचे ! यांनी 1922 मध्ये तेली समाचार पत्र काढले हे कार्य त्यांनी कै. रामचंद्र मेरूकर यांच्या प्रेरणेने केले. व तेली समाचार पत्र काढले. पश्चिम महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांची 4 वेळा तेली समाजाची परिषद भरवली. समाजासाठी भरलेल्या या समाजसेवकाने पदरमोड करुन हे सर्व केले !