घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (2)
विदर्भ तेली संघर्ष समितीचे प्रमुख मधुकर वाघमारे यांनी ४ पानी पत्रक तेली समाजाच्या राजकीय मंडळींना दिले. तसेच प्रसिद्धीस ही दिले. पण समाजाच्या खासदार, आमदार व राजकीय क्षेत्रातील मंडळींना साधी या पत्राची दखल ही घ्यावी वाटली नाही. तेली समाजाचे नाव पाहिजे. तेली समाजाची मते पाहिजेत. पण समाजाच्या हिताचा विचार येताच आपली सोय पाहिली जाते. परवा बिड मधील बातमी वार्या सारखी पसरली काही हौश्यांनी समाज पातळीवर आपल्या समाज निष्ठेचे प्रदर्शन ही भरवले.
संग्रहक (श्री गंगाधर काशिनाथ हाडके)
कै. ह. भ. प. श्री. वैद्य महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेचे मध्ये चंदनापरी देह झिजवून संपूर्ण जीवन अविवाहीत राहुन संस्थेचे मध्ये हजारो लाखो गुणवान विद्यार्थी घडविले ते आज संपुर्ण देशात सांप्रदायांचे कार्याचा झेंडा मिरवित आहेत. त्यांमध्ये नामकंत रामचरित्र कथाकार ह. भ. प. ढोक महाराजा सारखे महान विभुती त्यांचे शिष्य गण आहेत.
श्री. गंगाधर का. हाडके, उपाध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा सदुुंबरे
त्यामध्ये सामील होण्याची संधी आपल्या समाजातील जेष्ठ समाज बांधव कै. श्री. दादा भगत पुणे कै. श्री. धोंडीबा राऊत व पोलिस खात्यांतील कै. श्री देशमाने यांनी १९७७ श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्यांची संधी अनंत अडचणीला तोंड देत उपलब्ध करून दिली. आणि आता हा पालखी सोहळा दिमाखांत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्तगुरू श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळ्या बरोबर मार्गक्रमण करीत आहे.
पालखी निघाल्या नंतर ४/५ वर्षींनी मी पांच वारकरी घरी जेवणास बोलावत असे. नंतर ती प्रथा बंद झाली. परंतु सेवा म्हणुन ९१/९२ साली आमचा हिशोब करून देत जा आपण दिवानजी आहात व मार्केट मध्ये असल्यामुळे बहुतेक ट्रस्टी व्यापारी असल्या मुळे ओळख होतीच त्याचा उपयाोग व मी तिळवण तेली समाजाचा हिशोब तपासणीस व नंतर जा. सेक्रेटरी होतो. त्याचे माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळाली अध्यक्ष माधवराव आंबीके व नंतर मेरूकर अध्यक्ष झाले नंतर सन २००० पासुन माझी सेक्रेटरी म्हणुन नेमणुक झाली
श्री. ताराचंद देवराय
माझं १२ संपुन १३ व लागलेलं शाळेची सुट्टी संपुन शाळा चालु होण्याची लगबग नवीन कपडे, बुट, पुस्तक याचं आर्कषन अन घरात आपल्या संताजींची पालखी निघण्याची गडबड मी. आईला हट्टाला धरल मला पन पालखीला यायंचच. मी सारखा हट्ट धरला आई म्हणाली ती ह्यांना विचारेल आई आज विचारीन मग विचारीन माझी तगमग चालु होती. वडील माजघरात आल्यानंतर घरातल्या १, २ माणसांशिवाय त्यांच्याशी बोलायच हिंम्मत कोणालाही नव्हती. आईने विचारले आहो ह्या पोराला घ्याल का आपल्या बरोबर काही पडीलेली काम करील. वडीलांनी नाही म्हंटले