महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा या आपल्या संघटनेतील पश्चिम महाराष्ट्र विभागाची म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापुर जिल्हा, कोल्हापुर जिल्हा. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती तालुका, दौंड तालुका, इंदापुर तालुका या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक रविवारी दिनांक २२ मार्च २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीस विभागीय पदाधिकारी, विभागातील सर्व जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते येणे आवश्यक आहे.
डॉ सुधाकर चौधरी यांनी डॉ मेघनाथ साहा यांचे जीवनावर एक तास व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितीत तालुका व जिल्हा पदाधिकार्यांना डॉ मेघनाद साहा यांचा फोटो व माहिती पुस्तिका त्याच्या मार्फत वाटले व पुढच्या वर्षापासून डॉ मेघनाथ साहा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्व पदाधिकार्यांना आवाहन केले.
शिरवळ, सातारा - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती.
सुदुंबरेहुन पंढरपूरवारी साठी श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी रथाचे लोणंद येथे सातारा जिल्हा तिळवण तेली समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले व रथास फुलांची सजावट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली.
यावेळी प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष जयसिंगराव दळवी, रमेश गवळी, प्रवीण चांदवडकर, संदीप करपे, सुरेश चिंचकर, आनंदराव दळवी, रघुनाथ दळवी, अशोक भोज, राम पडगे, नमदेव झगडे व मान्यवर उपसिथत होते.
पालखीच्या रथाच्या स्वागता नंतर पालखी स्थळावर समाज बांधवांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
राजकारण हा त्यांचा पिंड होता. तो त्यांचा जन्मजात गुण होता. पटेल नेहरू, गांधी घराण्यात जन्म झाला आसता तर कही कष्टाविनाच त्यंाना सत्ता मिळाली आसती. ते जन्माने घाची (तेली) होते. त्यामुळे त्यांना सुरवात शुन्यातुन करावी लागली. आर. एस.एस. ही संघटना विचार परिपक्व करून देते. एव वेळ विचार परिपक्व झाले की ती व्यक्ती कुठे ही गेली तरी मुळ विचाराची फारकत घेत नाही.