महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- कोल्हापुर जिल्हा प्रांतीक महासभेचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर सह इतर १५ पदाधिकारी उपस्थीत होते. माळकर सर हे निवृत्त प्राचार्य असुन सद्या ते महत्वपुर्ण शिक्षण संस्था चालवतात तसेच ते अनेक शिक्षण संस्थावर पदाधिकारी असल्यामुळे कोल्हापुर प्रांतीक महासभेची वाटचाल आशादायी आहे. जिल्ह्यातील लिंगायत तेली समाजाचे महत्वपुर्ण पदाधिकारी सुनिल सावर्डेकर सह सह पांडुरंग वडगांवकर, गणेश वाळवेकर, मोहन फल्ले आदी अनेक पदाधिकारी आवर्जुन बैठकीस उपस्थीतीत होते.
जिल्ह्यातील तीन तालुक्यातुन आमदार पदासाठी तेली समाज तिकीट मागु शकतो अशी परिस्थीती आहे. स्वत: किसन घोडके भाजपा मधुन आमदार की साठी उत्सुक असुन पुढील काळात समाजाचे वतीने तिकीट मागणीसाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येईल
सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुरेखा हाडके यांनी आपला अहवाल मांडताना नमुद केले की, समाजातील पुरूष मंडळींनी महिलांना देखील समाजकार्य करण्याची समान संधी द्यावी. संघटनेच्या कार्यात महिलांचा दिवसेंदिवस सहभाग वाढत असुन लवकरच शिरवळ तेथे महिलांचा विभागीय कार्यक्रम घेण्याचा विचार चालु आहे.
हडपसर : जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लेखक श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हडपसर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुपारी 3 वाजता शामराव भगत यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
या वेळी संताजी तेली समाज हडपसरचे पदाधिकारी प्रितम केदारी, कुंडलीक देशमाने, अप्पा किरवे, रमेश डाफे, श्यामराव भगत, सुनील क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले.
आलेल्या वारकर्यांसाठी व भाविकांसाठी महाप्रसदांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा या आपल्या संघटनेतील पश्चिम महाराष्ट्र विभागाची म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापुर जिल्हा, कोल्हापुर जिल्हा. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती तालुका, दौंड तालुका, इंदापुर तालुका या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक रविवारी दिनांक २२ मार्च २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीस विभागीय पदाधिकारी, विभागातील सर्व जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते येणे आवश्यक आहे.