वाई : - सातारा सैनिक सहकारी बँकेचे शाखा मॅनेजर श्री. शरद दत्तात्रय किर्वे यांची ही मुलगी एस.एस.सी. परिक्षेत द्रविड हायस्कुल वाई या प्रशालेतुन ९८ मार्कांनी वाई शहर व तालुक्यात प्रथम आली आहे. तिचे अभिनंदन किर्वे, दळवी व देशमाने परिवारा तर्फे केले गेले आहे.
तेली समाज पुणे यांच्या कडुन जाहिर निषेधाचे पत्र
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.
संघटनेच्या माध्यमातुन समाज कार्य करत असताना आम्हाला जाती-जातीच्या भिंती उभ्या करावयाच्या नाहीत. भारतीय राज्य घटनेंशी आम्ही बांधील आहोत. जाती पोट-जाती निर्मुलन व जाती अंता साठी लढाई हे आमचे अंतीम उद्दीष्ट आहे. आमचे या तेली संघटनेचे कार्य म्हणजे, आमची ही न्याय हक्कासाठी ची, समता समानता प्रस्थापित करण्याची व परिवर्तनाची चळवळ आहे.
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.