यवतमाळ दि. १९ विदर्भ स्तरीय तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ द्वारे आयोजित शुभमंगलम उप-वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ परिचय पुस्तिकेच्या आधारे निर्णय घेवू नये, त्याची योग्य ती शहानिया करुनच निर्णय घ्यावा.
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाव्दारे विदर्भस्तरीय तेली समाजाचा ३३ वा उपवधू-वर परिचय पुस्तीका "शुभ मंगलम् प्रकाशन सोहळा" संताजी मंदिर संकटमोचन रोड, यवतमाळ येथे रविवार दि. १४/२/२०२१ रोजी सकाळी ९ वा आयोजित केला आहे. दरवर्षी मंडळ मोठ्या स्तरावर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असते परंतु यंदा कोवीड-१९ या जागतीक महामारीमुळे मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
नागपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या नागपूर शहर कार्याध्यक्ष पदावर आशिष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. महसभाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णराव हिंगणकर आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
ओबीसी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे .. महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभेचे राज्यपालांना निवेदन .
भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना १८७२ मध्ये झालेली होती आणि १८८१ पासुन दर १० वर्षांनी जनगणना होत आहे. भारतामध्ये १९३१ पर्यंत प्रत्येक जातीची जनगणना होत होती व यात प्रत्येक जातीची संख्या व शैक्षणिक, आर्थिक परिस्थीती बाबतची संपुर्ण माहिती यामध्ये नमुद करण्यात येत होती. तसेच १९४१ मध्ये सुध्दा जनगणनेत जातीचा कॉलम होता. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
नागपुर तेली समाज - संस्थापक अजय धोपटे व अध्यक्ष विजय हटवार. कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले व उपाध्यक्ष महेद्र भुरे. यांच्या आदेशावरून व हितेश बावनकुळे (राज्य सहसचिव), रूपेश तेलमासरे, कोषाध्यक्ष. गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख)व नागपुर शहर अध्यक्ष नानाभाऊ झोडे च्या मान्यतेनसार रोहन पिताबरजी मोटघरे यांना नागपुर शहर महासचिव पदी नियुक्ति करण्यात आली.