नागपुर तेली समाज - संस्थापक अजय धोपटे व अध्यक्ष विजय हटवार. कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले व उपाध्यक्ष महेद्र भुरे. यांच्या आदेशावरून व हितेश बावनकुळे (राज्य सहसचिव), रूपेश तेलमासरे, कोषाध्यक्ष. गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख)व नागपुर शहर अध्यक्ष नानाभाऊ झोडे च्या मान्यतेनसार रोहन पिताबरजी मोटघरे यांना नागपुर शहर महासचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
जिंतूर येथे राष्ट्रसंत वैकुंठवाशी श्री तुकाराम महाराज मुळ गाथा लेखक तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मराठवाडा तेली महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली.
देवळी शहरातीला मिरननाथ मंदिरमध्ये श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती विविधा सामाजिक संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी व देवळी तेली समाज यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूना अभिवादन करण्यात आले.
नागपुर तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे संताजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करूण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुजा अर्चणा केली.
.
मेहकर - येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.