श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019 सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.
नागभीड तेली समाज - तेली समाजाचे आराध्य महापुरुष संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 वा जयंती महोत्सव, समाज प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी शुक्रवार ते 21 डिसेंबर 2019 रोज शनिवार ला मौजा मिंडाळा ता. नागभीड येथे आयोजित केला होता
महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा - गडचिरोली विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा - गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली तेली समाज गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उप वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १५ डिसेंबर २०१९ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली
चांदूर बाजार, ११ डिसेंबर - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली.