वर्धा, दि. १८ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच स्वत:ला प्रसिध्दीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आपल्या पेक्षा मोठ्या नेत्यावर कारण नसताना टीका करायची आणि स्वतः करिता प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसीनसल्याचेसांगुन त्यांच्या जातीवर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून नाना पटोले यांनी विनाकारण वाद निर्माण केला आहे.
कन्हान - कल्पेश बावनकुळे या युवकाच्या हत्याऱ्यांना ४८ तासांच्या आत अटक करून कन्हान व ग्रामिण भागात रात्रीची गस्त आणि नागपुर बॉयपास महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा
धुळे - तेली समाजातील मार्केट यार्ड परिसरातील स्वामीनारायण सोसायटी मधील युवक स्व. पवन सुदाम चौधरी यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे अपघाती निधन झाले होते.अपघाती निधन झाल्यानंतर वसुधारा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री व्ही.जी. पाटील साहेब यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळाने सतत पाठपुरावा करून मदत मिळवून दिली.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू