Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी मंच नेरी यांच्या वतीने आज साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री प्रभाकर पिसे सर मुख्याध्यापक लोहारा तसेच वसंतरावजी आष्टनकर सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून हारार्पण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली
दि. 8 :- राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती ग्रा. प. कार्यालय गुंधा येथे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विठ्ठलराव कालदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्षमनराव भुजबळ, चिंतामनराव नव्हाळे,गोविंद राऊत सर,नंदुजी इंगळे, गजाननराव माने, किसनराव चिलपे, दिपकजी मानवत्कार, जयदेव तिरके व गावकरी मंडळी उपस्तित होते.
प.पु. जगतगुरु संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य लोकार्पण सोहळा. नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या बाराबंगला, मुख्य फॉरेस्ट ऑफिस, कोपरी, ठाणे (पू.) येथील प. पु. संत श्री. संताजी जगनाडे महाराज चौकात तेली समाजाचे जगतगुरु संत श्री. संताजी जगनाडे महाराज व तेली समाजाचे प्रतीक तेल घाणा यांच्या तैल चित्राचे (शिल्परचना) अनावरण व लोकार्पण सोहळा
श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे. सुदुंबरे ( ता. मावळ ) येथे संताजी महाराज यांचे समाधिस्थळ आहे. येथील क्षेत्रास राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे.
तेली समाज गडचिरोली, येवली परिसरातील तेली समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 'जन्मोत्सव कार्यक्रम' बुधवार दि. ०८/१२/२०२१ ला संपन्न होत आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतांनी तत्कालीन अनिष्ठ रूढी, वाईट परंपरा व अंधश्रध्देवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. परंतु समाजाला कायम अंधश्रेध्दत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकणारे असल्याने त्यांनी संताचा सुध्दा फार मोठा छळ केला.