Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज बुलढाणा डोणगाव : 8 डिसेंबर ग्रामपंचायत व सर्व शाळांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य डोणगाव येथील जिप कन्या शाळा, जिप मराठी प्राथमिक शाळा . शिवाजी हायस्कूल, मावा, पातरकर आणि ग्राम पंचायत येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
राहुरी तेली समाज : संत जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती राहुरी येथील तुळजामाता पालखी मंदिरात साजरी करण्यात आली. राहुरीचे तहसीलदार एफ. आय. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती अरूण तनपुरे, राहुरी नगर परिषदेच्यावतीने उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून
चामोर्शी - जनसंख्येने मोठ्या प्रमाणात असलेला तेली समाज आजही सरकारच्या उदासीन धोरणामुळे अन्यायाने पिचला जात आहे. किंबहूना जेव्हा-जेव्हा ओबीसींचा विचार आला तेव्हा ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाचा कणा असलेला तेली समाजबांधव व कुणबी यांचे अत्यंत हाल होत असून या बहुसंख्य समाजाला जनगणनेमध्ये स्थान नसावे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याने आतातरी संताजी जगनाडे महाराजांना स्मरून तेली समाजबांधवांनो आपल्या हक्कासाठी पेटून उठा,
परभणी येथील नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे रविवारी ता. ८ रोजी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या सर्व जि.शा.परभणी व महासभेच्या सर्व शाखीय च्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.संत श्री संताजी जगनाडे महाराजांवर संत श्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा प्रचंड प्रभाव होता.ते संत तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकर्यांन पैकी एक होते.
अकोला, ता. ८ : तुकोबाजी गाथा ज्यांनी घराघरात पोहोचवली असे तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.८) शहरतील पंच बंगला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संताजी सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत समस्त समाज बांधव सहभागी झाले होते.