Sant Santaji Maharaj Jagnade
दिपावली निमित्त सर्व तेली समाज बांधवासाठी दिपावली स्नेह मिलन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मा.खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे (प्रदेश अध्यक्ष भाजपा,महाराष्ट्र राज्य) मा.श्री. कैलासजी गोरंटयाल (माजी आमदार,जालना) मा.श्री.राजेशजी राऊत (उपनगराध्यक्ष,न.प.जालना) मा.श्री.अशोकआण्णा पांगारकर (उपप्रदेशाध्यक्ष,ओबीसी,जालना)
समस्त तेली समाज बंधु-भगिनीना सप्रेम संताजी तेली समाजाचे आराध्य दैवत तथा जगत गुरु तुकाराम महाराज यांची गाथा संकलीत करणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समस्त तेली समाज बांधवांपर्यंत पोहचावे या उदात्त हेतुने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती उत्सव सोहळा सन २०१८ गेवराई येथे दि. ०९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. आपण साजरी करण्यात येणार आहे.
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमान मंदिर जटपुरा पंच तेली समाज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर गुरुवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी दुपारी तीन वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जय संताजी बहुउद्देशीय तैलीक संघटना अमरावती नेरपिंगळाई चे वतीने आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर २०१८ शनिवार ला ठिक सकाळी १०.०० वाजता साजरी करण्याचे ठरविले आहे. तरी आपली सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यमाची वेळ : सकाळी 10 वा. स्थळ : श्री संत गुलाबपुरी महाराज मंगल कार्यालय, अमरावती, नेरपिंगळाई कार्यक्रमाची रुपरेषा
सालाबाद प्रमाणे याही वर्षी चाळीसगाव तेली समाजातर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा मूर्ती पूजन दिनांक 10-12-2017 रोजी रविवारी सकाळी आठ वाजता ठिकाण श्री संताजी मंदिर तेली गल्ली तेरी बहन चाळीसगाव कीर्तन सप्ताह दिनांक 10-12-2017 ते 17-12-2017 वेळ रात्री 9 ते 11 तर महाप्रसाद दिनांक 17-12-2017 रविवार