कोथरूड श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने ३० कार्यक्षम व विवध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सुतार होते. याप्रसंगी संताजी प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार- मोहिनी आणेकर यांना देण्यात आला.
मौदा . संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, मौदा तालुकाध्यक्ष कामिनी प्रल्हाद हटवार यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या मंगला खरवडे, लता जुमडे, रोशनी हटवार या महिलांचा कामिनी हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड तथा नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने प. दीनदयाल नाट्य सभागृह, उमरेड येथे दिनांक ११ मार्चला विविध क्षेत्रातील व विविध समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या (५१) महिलांना सन्मानित करण्यात आले.
संताजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडीचे जागतिक महिला दिन 11/03/2023 दुपारी 1 वाजता संपन्न. नामदेवराव रोकडे संताजी सभागृह गरोबा मैदान छापरू नगर नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औपचारिक साधून आपल्या भागातील महिला पुरुष वृद्ध तसेच लहान मुलं यांच्याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये रक्त तपासणी औषधी मोफत मध्ये देण्यात येतील आणि शिबिराच्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती.