मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
नागपुर - संत जगनाडे महाराजांनी संत तुकारामांची संपूर्ण गाथा त्यांच्या तल्लखबुद्धीने स्मरण करून लिहून काढली. त्यांनी समाजाला दिलेली ही मोठीच देणगी आहे. अशा समाज संतांचे उत्कृष्ट स्मारक साकारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गडचिरोली - संपूर्ण भारतभर विखुरलेल्या तेली या जातीला व विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी व तेली जातीला जाणून - बुजून आरक्षणापासून डावलण्यात आले आहे. धुंदीसाठी पोकळ आश्वासनेच आपल्या समाजाला देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. एवढेच नाही, तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ओबीसी व तेली समाजाला स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही न्याय मिळाली नाही, हेच आमचे सर्वात मोठे दुर्देव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष तथा खा. रामदास तडस यांनी केले.
संताजी सेना - राठेड बंगल्यापासून दुपारी 12.30 वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेच्या आग्रभागबी आश्वारूढ युवती होत्या, त्यानंतर महिला भजनी मंडळ, दिंड्या, पाठोपाठ एक सुशोभित वाहनावर संताजी महाराजचीं मुर्ती आरूढ होती. मंगलवाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
नाशिक - भव्य तेली समाज मेळावा : कळवण तालुका आणि सुरगाणा तालुका तैलिक महासभा महासभेच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर - रविवार रोजी दुपारी 3 वाजता अभोणा येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने सहकार, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
संताजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, समाजबांधवांची उपस्थिती
तेली समाजाच समग्र इतिहास सर्वांसमोर यावा : डॉ. महेंद्र धावडे
संताजी सेना अकोला - तेली समाजाचा प्रलग्भ इतिहास असून, महापुरूषांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची गरज आहे. तैलिक वशंच्या अनेक विभुतींनी कर्तृव्य बजावले आहे. त्याविषयी समाजाला माहिती झाल्यास प्रेरणा मिळू शकेल, असा विश्वास समाजाचे गाढे अभ्यासक डॉ. महेंद्र धावडे यांनी व्यक्त केला.