वरवेली, १० नोव्हें. (वार्ताहर) - सोशल मिडियाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असून तेली समाज युवासंघ जिल्हा रत्नागिरी या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तेली समाजातील युवावर्गाला एकत्र आणण्याचा महत्त्वाचे काम करण्यात येत आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही तेली चषक २०१८ चे आयोजन सुध्दा या युवा संघाच्यावतीने करण्यात येत आहे.
लोहसर/करंजी : गुरुदेव संत नारायण बाबा यांच्या प्रेरणेने सुरू झालेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा सालाबादप्रमाणे दि. ३ जानेवारी २०१९ रोजी तारकेश्वर भैरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला आहे. समाजातील केलेल्या उल्लेखनीय अशा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक एवं शैक्षणिक, राजकीय कामगिरीबद्दल व समाजसेवेबद्दल दरवर्षीप्रमाणे
तेली समाज, जालना च्या वतीने शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 रोजी संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती सजरी करण्यात येणार असून आपण सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती करण्यात आलेली आहे. जयंती निमित्त खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
चला सुदुंबरे या उपक्रमामागची भूमिका । तेली समाज बांधवांनी एकत्रित यावे, आणि समाजाला एक उन्नत दिशा द्यावी, या उदान्त विचारांनी आदरणीय केशरकाकु क्षिरसागर यांनी पुढाकार घेवून महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा या नावाची संस्था स्थापन केली.
नागपुरच्या पातळीवर या संस्थेच्या कार्याची जबाबदारी युवा नेतृत्व म्हणून श्री. सुभाष घाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. नागपूर युवा आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत श्री. सुभाष घाटे यांनी, त्यांच्या सहकार्याने समाज कार्य केले. त्यांच्या कार्याची समाजानेही दखल घेतली....
तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराजांची जयंती मंत्रालय व सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक २६ डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे तैलिक समाजात उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.