औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. ह भ प बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. आभार पवार यांनी मानले,
पैठण - संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्या सूचक कल्पनेतून गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यावेळी पैठण नगर परिषद अध्यक्ष दत्ता गाडे, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद संदलंबे , उपाध्यक्ष देशमुख महाराज आळंदीकर,
जालना : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ वी जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रम साजरे करून त्यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विशेषत: महिलांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाच्या सुरूवातील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोदीखाना भागातील पंचायत वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात ४० जणांनी वदान केले.
यवतमाळ - तेली समाज विवाह व सांस्कृतीक मंडळ यवतमाळ रजि नं.१७९ द्वारे दिनांक २० जानेवारी २०१९ ला संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथील भाषणात सकाळी ११ वाजता पासून सर्व शाखीय तेली समाजाच्या उप वधु वर परिचय मेळाव्याचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उप वधु वर परिचय पुस्तीकचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान