Sant Santaji Maharaj Jagnade
राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 6) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात पिंपळगाव येथे गोटीरामबाबांचा जन्म झाला. अतिशय हुड असणारा हा मुलगा मंगलदास बाबांच्या सहवासात आल्यावर बदलून गेला. रोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठायचे 4 मैलांवर असणार्या हमरापूर गावी पोहत गोदावरीत स्नान करायचे आणि ओल्या धोतरावर मारूतीला प्रदक्षिणा घालायची असा त्यांचा क्रम सुरू झाला.
रविवार दि.७ जुलै २०१९ पुणे जिल्ह्यातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या छोटे काश्मीर म्हणून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा मावळ तालुका येथील तळेगाव दाभाडे मधील गजबजलेल्या वस्तीतील नाना नानी पार्क सभागृहात मावळ तालुका तैलिक महासभेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय संस्था तळोधी (मो.) ता. चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रम स्थळ :- जगनाडे महाराज मंदिर रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९
कार्यक्रमाची रूप रेषा
७/१२/२०१९, घटस्थापना, सायं. ६.०० वा. सहभाग, समाजबांधव
राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त नगर शहरात दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने परिपत्रक काढून संताजींची जयंती उत्सव साजरा करण्याचे सूचित केले असून ही बाब समाजाच्या दृष्टीने उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करणारी आहे. तरी समाजातील तिळवण तेली समाज ट्रस्ट, जिल्हा तेली समाज महासभा,श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, श्री संताजी विचार मंच, श्री.संताजी महिला मंडळ, श्री.संताजी नागरी सहकारी पतसंस्था व समाजातील बांधवानी यात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यात आली आहे.