रिसोड (वाशिम) :- श्री आप्पास्वामी संस्थान येथे श्रीकृष्ण महाराज आसनकर यांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांचे पूजन व आरती करण्यात आली व यामध्ये रिसोड शहरातील तेली समाज बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावर्षी करोना मुळे अत्यंत साधारण साध्या पद्धतीने श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
नायगाव, दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा ची गरोबा म य दान येथे संताजी मंगल कार्यालय येथे 8 डिसेंबर संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम निमित्य संघटनांचे सचिव अजय धोपटे यांचा नेतृत्वात आयोजित केले होते याप्रसंगी प्रमुख उपस्तिथी रामेशजी गिरडे माजी नगसेवक नाना झोडे
‘कोराना’ संकटाशी सामना करण्यासाठी येथील रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनच्यावतीने बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी हाई-फ्लो ऑक्सीजन थेरेपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
पुणे विधानभवन परिसातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत श्याम पन्हाळे यांनी हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन सुपूर्द केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, फाऊंडेशच्या संगिता पन्हाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे. येथे संतांची मोठी श्रृंखला आहे. संतांनी सर्व जातीत जन्म घेऊन भगवद् भक्तिच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे जीवापाड प्रयत्न केले. शैव, वैष्णव, सगुण, निर्गुण अशा सर्व सामंजस्य प्रकारच्या संत परंपरा विकसित केल्या. केंद्र बिंदु पंढरपूर असून विठ्ठलाच्या नामस्मरणात भजन, किर्तन करीत लाखोंच्या संख्येने पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.