४ एप्रिल रोजी होणारा श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड चा वधू वर मेळावा रद्द
श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित, वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक चार एप्रिल रोजी होणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि शासनाच्या आदेशानुसार, समाजबांधवांच्या आरोग्याचा विचार करता, सदर मेळावा रद्द करून, फक्त पुस्तक प्रकाशनाचा निर्णय मेळावा कमिटीने घेतला असून, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम 13 एप्रिल गुढीपाडवा या दिवशी घेण्यात येणार आहे.
पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
आपल्या भारत देशात अनेक संत, महंत आणि महामानव होवून गेलेत. त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेवून नवीन पिढी घडत आहे. संत आणि महामानवांच्या विचारांतून तरुण तयार होत आहेत. परंतु अनेक असे संत आहेत की त्यांचे कार्य, विचार दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी - सनातनी व्यवस्थेला टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखक - इतिहासकारांनी केलेला आहे.
कोथरूड, दि. १ - मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री संताजी प्रतिष्ठानला हक्काची जागा मिळाली आणि कोथरूड परिसरात प्रतिष्ठानची इमारत उभी राहिली. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते पृथ्वीराज सुतार यांची साथ मिळाली. त्यामुळे सुतार यांच्या हस्ते श्री संताजी भवन या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
दि 08/ 12/ 2020 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने संत श्री संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सुरेश नाईकनवरे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा ,राठोड साहेब ,सुरडकर साहेब ,सातव साहेब नांदुरा या अधिकाऱ्यांसह