Sant Santaji Maharaj Jagnade
धुळे - तेली समाजाचे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ३९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, शहर सचिव राकेश चौधरी यांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी वर्षभर चालणा-या जनजागृती प्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुणे - जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखक व आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. समस्त तेली समाज संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्या वतीने कर्वे नगर येथील श्री संताजी भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
पारोळा : अभ्यास एवढा करा की, यशाने आकाशाला गवसणी घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
पिंपळनेर : येथील तेली मंगल कार्यालय येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेली समाजाने अभिवादन केले. संताजी महाराजांच्या प्रतिमेस शंकर चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण केले. यावेळी तैलीक महासभा तालुकाध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, डी. डी. महाले, कांतिलाल चौधरी, सुरेश बागूल, संजय बागूल, कन्हय्यालाल सूर्यवंशी