सुमारे २१ कुटुंबीयांची कुलदेवता. सुमारे २५० वर्षांची परंपरा नित्यपूजा, नवरात्रौ उत्सव, प्रतिवर्षी पाडवा नववर्ष - देवरुप - श्रीफळ बदल, भट वाढणे, गणेशोत्सव गोकुळाष्टमी, नवरात्री उत्सव, त्रैवार्षिक तिसाल उत्सव इ.
वाडा - सडा येथील हनुमान मंदिर या मार्गावरील साऱ्यांचे लक्षवेधक स्थान आहे. यांची संपूर्ण मालकी मंडळाचे सल्लगार आप्पाजी वाडेकर यांची आहे.
पिंपळगाव, ता वैजापूर (अॅडव्होकेट गणपतराव सावणे, गंगापूर ह्यांनी लिहिलेल्या मुळ चरित्रावरुन संक्षिप्त केलेले चरित्र)
प. पूज्य गोटीराम बाबा यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मौजे गाढे पिंपळगाव या खेडेगावीतेली समाजात झाला.
श्री ईसवटी ब्राह्मणदेव मंदिर, बोर्डव, बामणवाडी ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
कणकवली पासून ११ कि. मि. अंतरावर बोर्डवे हे गाव असून तेथे तेली समाजवाडी वाडीत वास्तव करुन आहे. फार प्राचीन काळापासून शेताच्या बांधावर मातीच्या पारावर पाषाण स्वरुपात असे श्री ईसवटी ब्राह्मणदेव नावाचे स्थळ असून तेली कुटूंबिय पूजाबल्ती करत असत. वार्षिक भक्ष्य दिले जाई व दुसऱ्या दिवशी ब्राह्मणा कडून एकादशी ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले जात असे.
वेंगुर्ला तालुक्यातील मांगल्याचा मठ या गावी तेली समाजाचे श्री भूमिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा पूर्वइतिहास काही जात नाही परंतु या समाजाची मुळे कुलदेवता साळशी (ता. देवगड) येथे आहे. त्या देवीच्या प्रतिमेनुसार सन २००० साली या देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून या मंदिरात वर्षातून दोन उत्सव साजरे केले जातात. या मंदिरात श्री भूमिका देवीच्या मूर्तीसोबत मुळपुरुष म्हणून श्रीफळाची पूजा केली जाते.