Sant Santaji Maharaj Jagnade दि 08/ 12/ 2020 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने संत श्री संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सुरेश नाईकनवरे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा ,राठोड साहेब ,सुरडकर साहेब ,सातव साहेब नांदुरा या अधिकाऱ्यांसह
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.
सुदुंबरे - श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा २०२१ चे नियोजनाची सभा श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी झाली. कोरोनामुळे यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे, यावर्षी ११ जानेवारी आणि १२ जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम समाज मेळावा, शिक्षण समिती कार्यक्रम, दुसऱ्या दिवशीची वार्षिक सर्वसाधारण आणि महाप्रसाद असे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
धार्मिक श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे 20 गुंठे जागेत होणार भव्यदिव्य मंदिर, पतके कुटुंबाचा मंदिरासाठी पुढाकार
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर निळोबाराय महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पारनेर येथील संजय पतके, विजय पतके, अजय पतके यांचे वडील कोंडीभाऊ पतके मातोश्री सुमन कोंडिबा पतके यांच्या हस्ते पिंपळनेर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
परभणी - आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मंगळवार ८ डिसेंबर रोजी नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.