कारंजा येथील श्री. संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शाखा कारंजा व श्री. संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे संयुक्त विद्यमाने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.
जामखेड : यावेळी जामखेड तालुका प्रातिक तेली महासभा संताजी युवा प्रतिष्ठान जामखेड तालुका प्रातिक तेली महिला महासभा समाजा तर्फे श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंंती जामखेड येथे विठ्ठल अण्णा राऊत यांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली. तसेच जामखेड तहसिल कार्यलय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यलय, जामखेड नगरपरिषद या सर्व ठिकाणी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल,पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल व कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या वतीने श्री. शनैश्वर मंदिर टपाल नाका पनवेल व पनवेल महानगरपालिका कार्यालयात
रिसोड (वाशिम) :- श्री आप्पास्वामी संस्थान येथे श्रीकृष्ण महाराज आसनकर यांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांचे पूजन व आरती करण्यात आली व यामध्ये रिसोड शहरातील तेली समाज बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावर्षी करोना मुळे अत्यंत साधारण साध्या पद्धतीने श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
नायगाव, दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.