मालवणमध्ये देऊळवाड्यातील तेलीवाडीत भाद्रपद महिन्यात गौरी विर्सजन कार्यक्रम संपल्यावर रात्रौ वाडीतील सर्व कुटुंबे एकत्र येऊन गौरीच्या नैवेद्यासाठी बनविलेल्या भाकरी आणि शेवग्याची भाजी करतात ती एकमेकांना वाटतात. सर्व इष्ट, मित्रमंडळी व तेली कुटुंबे नैवेद्यम्हणून स्नेहभोजनाचा समारोह गेली कित्येक पिढ्या साजरा करत आहेत.
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमातेचे हिंदळे राणेवाडी येथेमंदिर आहे. येथे दर तीन वर्षांनी श्री देवी भवानी मातेचा गोंधळ उत्सव असतो. या उत्सवासाठी हजारो तेली बांधव उपस्थित असतात. मुंबईकर
देवगड तालुक्यात तोरसोळे येथे एकमेव तेली समाज मंदिर आहे. या मंदिरामध्ये संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असून त्याची नेहमी पूजाअर्चा केली जाते. येथील तेली बांधवांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात येथील समाजाचे वार्षिक उत्सव होतात.
श्री संताजी प्रतिष़्ठान , कोथरूड, पुणे आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली वधू - वर पालक परिचय मेळावा शुक्रवार दि. 01/05/2020 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत स्थळ - अशिष गार्डन , सर्व्हे न 82/24, डि.पी. रोड, शास्त्री नगर, कोथरूड पुणे 411 038 संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता
सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.