अमरावती : संताजी जगनाडे व एक महाराजांचा इतिहास तेली समाजमाता जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीती व्हावा, या अनुशगांने ही (OnlineQuiz) प्रश्नमंजुषा तयार केली आहे. समाजाचा प्रचार व प्रसार व्हावा, संताजीची ओळख ही घराघरात पोहचावी, ही कल्पना लक्षात घेत ही प्रश्नमंजुषा मंडळाचे संचालक प्रा. स्वप्निल वि.खेडकर यांनी तयार केली.
नारायणगाव तिळवण तेली समाजाचे सामाजिक कार्यातील गौरवास्पद कार्य व सुदिप भाऊ कसाबे यांच्याबद्दल गर्व गरिब व गरजूलोकांना मदतीचे कार्य चालू असताना सुदीपभाऊ कसाबे यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मदत म्हणून ५१०००/- रु. च्या ७०० तेलाच्या बाटल्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट व तिळवण तेली समाजामार्फत नारायणगाव ग्रामपंचायतीस सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे.
औरंगाबाद - माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गेल्या मंत्रिमंडळात फलोउत्पादन व रोहोयो कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले,आपल्या उच्च शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर शिवसेना पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळ्याचे अनुदान वाढून दिले,ओला दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे,
लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे.
घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.
हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.