सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
देवगाव रंगारी, ता. १० (बातमीदार) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील तेली समाजबांधवांतर्फे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी (ता. आठ) साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
औरंगाबाद तेली समाज - दरवर्षी प्रमाणे तेली युवा संघटनेतर्फे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त खोकडपूरा येथून तिळवण तेली समाज मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भाऊ देशमाने, हरिश भाऊ चौधरी, दीपक भाऊ पाखरे,चौधरी काका, योगेश भाऊ शेलार, संतोष भाऊ सुरूळे , तेली युवा संघटनेचे उपाध्यक्ष ईश्वर पेंढारे ,संतोष सुरूळे कृष्णा पेंढारे,
राज्य शासनाच्या अख्यातरीत येणाऱ्या सर्वच शासकीय कायालयात श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक निघाले. त्याअनुशंगाने सर्व शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीचा कार्यक्रम व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, महिला आघाडीन पुढाकार घेतला आहे. श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक आणि प्रतिमा भेट देण्याचे कार्य समाजाने हाती घेतले आहे.