माणूस कर्मानेच मोठा होत असतो. कुणी स्वतःसाठी कर्म करतो. तर कुणी जगासाठी झिजतो. समाजासाठी झिजणे हेच खरे जगणे होय, असे मत ह. म. प. नागोराव भडदमकर महाराज यांनी आज यथे व्यक्त केले.
एस. एम.सी. शाळेच्या सभागृहात तेली समाज मंडळाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मडदमकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ समाजबांधव प्रा. हरिभाऊ क्षिरसागर अध्यक्षस्थानी होते.
लोणावळा तेली समाज - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती लोणावळा नगर परिषदेत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले तर उपनगराध्यक्ष श्रीघर पुजारी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेविका सुमनताई होगले, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दुगुडि, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर सोलापूर जिल्हाध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती पंढरपुरातील मध्यवर्ती शिवतीर्थ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले व अंध अपंग शाळेतील मुलांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अंध अपंग शाळेतील मुलांनी गीत गायनाने केले.
औरंगाबाद - संताजी जगनाडे महाराज यांना संत तुकाराम महाराज यांचा सहवास वयाच्या दहाव्या वर्षांपासून लाभला. संताजी महाराजांनी व तुकाराम महाराजांनी आपल्या प्रबोधनातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतरही ती पुन्हा लिहून समाजासमोर शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, असे प्रतिपादन सोमनाथ सुरडकर यांनी केले.
मालेगाव : महानगर तेली समाज व श्री संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुणे आमदार दादा भुसे यांच्या हस्ते आरती व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तेलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना