नगर - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमीत्त भव्य सर्व रोग निदान शिबीर सवलतीच्या दरात रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे दि. ०८ डिसेंबर २०२१, बुधवार, वेळ : सकाळी १०.०० ते दु. २.०० पर्यंत सकाळी ८ वा. ( मास्क अनिवार्य आहे ) आयोजित करण्यात आलेले आहे.
संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा, महाराष्ट्र राज्य. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा, महाप्रसाद व मास्क वाटप, बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ९.३० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर. सर्व तेली समाज बांधवांन तर्फे, सालाबाद प्रमाणे यंदाही तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज
श्री.संताजी जयंती व संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त भव्य महिला भजन स्पर्धा (फक्त यवतमाळ शहरातील महिलांकरीता) रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ ला, सकाळी १० वाजता स्थळ : संत गाडगेबाबा सभागृह, उज्वल नगर भाग-२, वडगांव, यवतमाळ प्रथम बक्षीस रोख रू. ७,००१ / श्री संताजी पतसंस्था, यवतमाळ यांच्या तर्फे द्वितीय बक्षीस रोख रू. ३,००१/
अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती
पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.