प.पु. जगतगुरु संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य लोकार्पण सोहळा. नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या बाराबंगला, मुख्य फॉरेस्ट ऑफिस, कोपरी, ठाणे (पू.) येथील प. पु. संत श्री. संताजी जगनाडे महाराज चौकात तेली समाजाचे जगतगुरु संत श्री. संताजी जगनाडे महाराज व तेली समाजाचे प्रतीक तेल घाणा यांच्या तैल चित्राचे (शिल्परचना) अनावरण व लोकार्पण सोहळा
श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे. सुदुंबरे ( ता. मावळ ) येथे संताजी महाराज यांचे समाधिस्थळ आहे. येथील क्षेत्रास राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे.
तेली समाज गडचिरोली, येवली परिसरातील तेली समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 'जन्मोत्सव कार्यक्रम' बुधवार दि. ०८/१२/२०२१ ला संपन्न होत आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतांनी तत्कालीन अनिष्ठ रूढी, वाईट परंपरा व अंधश्रध्देवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. परंतु समाजाला कायम अंधश्रेध्दत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकणारे असल्याने त्यांनी संताचा सुध्दा फार मोठा छळ केला.
धुळे - संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबरला जयंती व १ जानेवारीला पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुरु-शिष्य स्मारक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी तेली समाज मंडळाने केली आहे. याविषयी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन देण्यात आले.
दि.१ जानेवारी २०२१ ते २० डिसेंबर २०२२ हे वर्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष म्हणून तिर्थ क्षेत्र, संतुबरे येथे साजरे होत आहे. या निमित्ताने संताजी महाराजाच्या पादुका व गाथा यांची भव्य रथयात्रा महाराष्ट्रभर काढण्याचे नियोजित आहे. या निमित्ताने सर्व समाज बांधवांना महाराजांचे पादुका व गाथा यांचे दर्शन घेता येईल. याची सुरुवात दि. ८/१२/२०२१ रोजी महारांची जयंती दिनांका पासून श्री क्षेत्र संदुबरे येथून सुरुवात होत आहे.