चिंचोली (नकीब) फुलंब्री तालुक्यातील चिंचोली (नकीब) येथील ग्रामपंचायत कार्यालयात व ग्रामदैवत श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरात संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुंडलिक जंगले, तुकाराम जंगले, भाऊसाहेब जंगले, मनोहर जंगले, सोनाजी जंगले, वसंत जंगले, भाऊसाहेब जंगले, विजय देवकर, सुरेश वाढेकर, नारायण दळवी,
अर्धापूर तालुका तेली समाज - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन तरूणांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालवून भविष्यातील आवाहने पेलविण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अॅड. किशोर देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र तैलिक युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत गटनेते अॅड. किशोर देशमुख हे होते.
माणूस कर्मानेच मोठा होत असतो. कुणी स्वतःसाठी कर्म करतो. तर कुणी जगासाठी झिजतो. समाजासाठी झिजणे हेच खरे जगणे होय, असे मत ह. म. प. नागोराव भडदमकर महाराज यांनी आज यथे व्यक्त केले.
एस. एम.सी. शाळेच्या सभागृहात तेली समाज मंडळाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मडदमकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ समाजबांधव प्रा. हरिभाऊ क्षिरसागर अध्यक्षस्थानी होते.
लोणावळा तेली समाज - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती लोणावळा नगर परिषदेत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले तर उपनगराध्यक्ष श्रीघर पुजारी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेविका सुमनताई होगले, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दुगुडि, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर सोलापूर जिल्हाध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती पंढरपुरातील मध्यवर्ती शिवतीर्थ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले व अंध अपंग शाळेतील मुलांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अंध अपंग शाळेतील मुलांनी गीत गायनाने केले.